स्पृहा जोशीने शेअर केल्या तिच्या घराच्या खास आठवणी

By  
on  

लॉकडाऊनच्या या २१ दिवसांत अभिनेत्री स्पृहा जोशी एक डायरी शेअर करतेय. तुम्हाला माहितच असेल. यात तिला ज्या गोष्टींबद्दल माणसांबद्दल, आठलवणींबदद्ल कृतज्ञ वाटतं, ते ती तिथे शेअर करते. आज तर तिने खुपच छान आठवण मांडली. घर म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. लहान असो किंवा मोठं घर , जुनं असो किंवा नवं. प्रत्येकाला आपल्या घराबद्दल एक आपुलकी असते, आठवणींचा खजिना त्यात दडलेला असतो. अशीच पहिल्या-वहिल्या घराची आठवण शेअर करताना स्पृहा हरखून गेली.

स्पृहा पोस्टमध्ये म्हणते,"आम्ही आत्ता राहतो आहोत ते आमचं घर. मी आणि वरदने मिळून घेतलेलं. 'आमचं' पाहिलं घर. हे घर घेण्याचं ठरवल्यापासून ते इथे शिफ्ट होण्यापर्यंतचा सगळा प्रवास रोमांचक होता. त्यात demonetization झालं. त्यामुळे घेतलेला निर्णय cancel करावा लागतो की काय असं ही वाटून गेलं. आत्ता एवढा मोठा decision घेणं बरोबर आहे की नाही, हे सगळं आपल्याला झेपेल की नाही असे असंख्य विचार मनात यायचे. पण शेवटी विश्वासाने उडी मारली. जरा मोठीच. बघता बघता या घरात येऊन यंदा दोन वर्ष झालीसुद्धा. अजूनही दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच आहे. पण रात्री काम पूर्ण झाल्यानंतर या घरातल्या आमच्या रूम मध्ये आलं की तो coziness सगळी टेन्शन्स विरायला लावतो. सकाळी चहा घेत इथल्या खिडकीत बसले की पुढचा दिवस सोपा वाटायला लागतो. 'आमचं घर'! This is the place I'm most grateful for! तुम्हाला कोणत्या जागेबद्दल कृतज्ञ वाटतं मला नक्की सांगा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day9 #9 What place are you most grateful for ? आम्ही आत्ता राहतो आहोत ते आमचं घर. मी आणि वरदने मिळून घेतलेलं. 'आमचं' पाहिलं घर. हे घर घेण्याचं ठरवल्यापासून ते इथे शिफ्ट होण्यापर्यंतचा सगळा प्रवास रोमांचक होता. त्यात demonetization झालं. त्यामुळे घेतलेला निर्णय cancel करावा लागतो की काय असं ही वाटून गेलं. आत्ता एवढा मोठा decision घेणं बरोबर आहे की नाही, हे सगळं आपल्याला झेपेल की नाही असे असंख्य विचार मनात यायचे. पण शेवटी विश्वासाने उडी मारली. जरा मोठीच. बघता बघता या घरात येऊन यंदा दोन वर्ष झालीसुद्धा. अजूनही दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच आहे. पण रात्री काम पूर्ण झाल्यानंतर या घरातल्या आमच्या रूम मध्ये आलं की तो coziness सगळी टेन्शन्स विरायला लावतो. सकाळी चहा घेत इथल्या खिडकीत बसले की पुढचा दिवस सोपा वाटायला लागतो. 'आमचं घर'! This is the place I'm most grateful for! तुम्हाला कोणत्या जागेबद्दल कृतज्ञ वाटतं मला नक्की सांगा. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

स्पृहाने या पोस्टमध्ये तिच्या घराचे अनेक सुंदर फोटोसुध्दा शेअर केले आहेत. स्वत:च्या घराची मजाच काही और असते याचा आनंद या फोटोंमधून तिच्या चेह-यावर स्पष्ट झळकतोय.

Recommended

Loading...
Share