Quarantine : स्मिता तांबेने बनवला टेस्टी केक, पाहा Video

By  
on  

आता देशात तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. घरात बसणं कितीही कंटाळवाणं वाटत असलं तरी एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांचं पालन करणं व स्वत:ची, कुटुंबियांची या करोनाच्या प्रादुर्भावापासून काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता आज सर्व व्यवहार ठप्प आहेत. पण थोडं सकारात्मकतेने बघितलं तर या वेळेचा सदुपयोग नक्कीच करता येण्यासारखा आहे. 

कोणी, वाचन करतंय, छंद जोपासतंय तर कोणी घरकामात व्यस्त आहे. आपली मराठी सिनेसृष्टीतली बेधडक पंगा गर्ल स्मिता तांबेसुध्दा या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतेय.स्वयंपाकात तर ती रमली आहेच, पण त्यात नाविन्य शोधतेय. नुकतंच तिने खमंग असा रव्याचा टेस्टी केक बनवला. सोशल मिडीयावरुन तिने तो व्हिडीओ शेअरसुध्दा केला  आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . . For more updates follow @peepingmoonmarathi . . . #smitatambe #actress #marathi #peepingmoon #peepingmoonmarathi

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

आपण सर्वांनीच आपल्या लाडक्या कलाकारांप्रमाणे वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. सतत काहीती नवीन शिकलं पाहिजे. 

 

Recommended

Loading...
Share