अमेय वाघने तरुण मुलांना दिलं हे अनोखं चॅलेंज, अमेयचं साडी चॅलेंज 

By  
on  

सध्याच्या क्वारंटाईन कालावधी घरात बसून काय करावं हा कित्येकांचा प्रश्न असेल. यातच सोशल मिडीया आणि इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर हा पर्याय लोकांपुढे आहे. सोशल मिडीयावर विविध चॅलेंजेसचा पाऊस तर इंटरेनटच्या माध्यमातून वेब सिरीज पाहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र सोशल मिडीयावरील विविध चॅलेंजेस सध्या लक्ष वेधत आहेत. कुणी जुने फोटो पोस्ट करण्याचं चॅलेंज करतय तर कुणी काय. यातच अभिनेता अमेय वाघने नुकतच दिलेलं चॅलेंज हटके ठरतय.

अभिनेता अमेय वाघने त्याच्या ‘दळण’ या नाटकातील एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोत अमेय वाघच्या डोक्यावर पदर पाहायला मिळतोय. अमेयला स्वत:चा हा फोटो पाहून सुचलयं एक नवीन चॅलेंज. या चॅलेंजचं नाव त्याने साडी चॅलेंज असं ठेवलय. या चॅलेंजमध्ये त्याने मुलांना साडी नेसून केर काढतानाचे, फर्शी साफ करतानाचे, भांडी धुतानाचे, धुणं धुतानाचे फोटो पोस्ट करायला सांगीतले आहेत. या पोस्टमध्ये अमेय वाघ लिहीतो की, “सारी चॅलेंज. सगळ्या मुलांना हे चॅलेंज द्यायला माल आवडेल. साडी नेसलेला तुमचा एक फोटो पोस्ट करा. या फोटोत फक्त तुम्ही असाल. मिशी आणि दाढी असलेल्या या फोटोंमध्ये तुम्ही केर, फर्शी, भांडी, धुणं धुतानाचे हे फोटो असतील. आणि मग आणखी गॉर्जियस मुलांना हे चॅलेंज करण्यासाठी टॅग करा. कृपया करुन ही चेन तोपर्यंत तोडू नका जोपर्यंत लोकं भिंतीवर डोकं आपटुन ‘अरे बास करा हे चॅलेंज’ असं म्हणत नाहीत.”

अमेयने नुकतच पोस्ट केलेल्या या चॅलेंजला आता कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं मजेशीर ठरेल 
 
 

Recommended

Loading...
Share