सिद्धार्थ जाधवची लेक म्हणते, मराठी समजत नाही इंग्लिशमध्ये सांगू? ऐका तर तिचं

By  
on  

 सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो तो म्हणजे लॉकडाऊन. या एका शब्दाने सध्या प्रत्येकाचं आयुष्य व्यापलं आहे. करोनाने आज जवळपास प्रत्येकालच घरी बसण्यास भाग पाडलं. करोनामुळे आजपर्यंत जवळपास तीन अब्जाहून जास्त लोक घरात बंदिस्त आहेत. करोनापासून बचावासाठी गरजेचं आहे हात धुणं. करोनाचा विषाणू ओलसर जागी पसरतो आणि वाढतो.

 

 

त्यामुळे चेह-याला हात न लावणं आणि सतत हात धुवायला सांगितलं जातं. यावर अनेक सेलिब्रिटींनी व्हिडियो पोस्ट करत जनजागृती केली आहे. सिद्धार्थ जाधवने त्याच्या घरातील छोट्या सेलिब्रिटीचा व्हिडियोही शेअर केला आहे. ही सेलिब्रिटी आहे सिद्धार्थची जाधवची लेक इरा जाधव. सिद्धार्थने इराचा हात कसा धुवावा याबाबतचा व्हिडियो पोस्ट केला आहे. छोटी इरा अतिशय आत्मविश्वासाने या व्हिडियोमध्ये हात धुण्याविषयी सांगताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share