By  
on  

प्रशांत दामलेंनी उघडलीये ‘दामले मास्तरांची शाळा’

करोनाच्या संसर्गाच्या तिस-या टप्प्यात आपण आहोत. हा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सरकारने 23 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता, बरेचसे लोक घरात बसून आहेत. एरवी कामानिमित्त बाहेर असणारी मंडळी सतत घरात असल्याने एकमेकांशी खटके उडणं तर स्वाभाविक आहे. त्यातही नवरा-बायको या वर्गाचे खटके तर सतत उडत असतात. अशा जोडप्यांसाठी अभिनेते प्रशांत दामले घेऊन आले आहेत ‘दामले मास्तरांची शाळा’. 

 

 

प्रशांत दामले या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतात, ‘घरोघरी 24 तास नवरा बायको घरी बसणार म्हणजे एक्स्ट्रा  क्लासेस घेणं आलंच. या काळातही सर्वांचा संसार सुखाचा राहावा यासाठी थोड्या टिप्स देतो बरं!’ असं म्हणत त्यांनी पहिली टिप दिली आहे. ते म्हणतात, ‘लोळत राहून बायकोची चिडचिड वाढवू नका’. आता दामले गुरुजींच्या या शिकवणीमुळे किती जणांचे लॉकडाऊनमधील संसार यशस्वी होतात ते कळलेच.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive