By  
on  

छोटी रमा म्हणजेच सृष्टी पगारेने रामनवमीच्या निमित्ताने गायलेलं हे गीत ऐकाच !

काल (दि, 3 एप्रिल) रामनवमी देशभर साजरी केली गेली. करोनाचं सावट आणि लॉकडाऊनमुळे ही रामनवमी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याकडे प्रत्येकांचा कल होता. यावेळी छोट्या पेशवीणबाई म्हणजे सृष्टी पगारेने मात्र तिची रामनवमी स्वरांनी खास बनवली. सृष्टी आणि तिची बहीण राशी पगारेने गदिमांच्या गीत रामायणामधील ‘कुश-लव रामायण’ गाती हे गीत सादर केलं. 

 

 

सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शो मधून सृष्टी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिथेही तिच्या गायनाने सारे मंत्रमुग्ध झाले होते. सृष्टीची बहीण राशीही गायिका आहे. सृष्टीने स्वामिनी या मालिकेतून अभिनयात पदार्पण केल. या मालिकेत ती रमाबाई पेशव्यांच्या भूमिकेत दिसत आहे. रमाबाईंच्या या व्यक्तिरेखेसाठी सृष्टीचं कौतुक होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive