By  
on  

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींवर हल्ले करणा-यांवर डॉ. अमोल कोल्हे भडकले

अभिनेता, खासदार असलेले डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडियावर कायमच अ‍ॅक्टीव्ह असतात. अनेकदा ते विविध पोस्टही चाहत्यांशी शेअर करत असतात. पण अमोल यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. अमोल यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. यात ते डॉक्टर, नर्स आणि इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या व्यक्तींवर होत असलेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला आहे. 

 

 

अमोल म्हणतात, ‘काही दिवसांपुर्वी डॉक्टर, नर्स आणि पोलिसांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं होतं. पण आता असं काय झालं की आपण त्यांच्यावर हल्ले करायला लागलो. जर हे लोक आपल्या जीवावर उदार होऊन आपल्यासाठी काम करत असतील तर आपण त्यांच्याशी नीट वागण्याचं औदार्यही दाखवू शकत नाही का? अमोल यांची मुख्य भूमिका असलेली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका नुकतीच झी मराठीवर परत सुरु झाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive