By  
on  

पंतप्रधानांवर टिका करणा-यांना गायक सलील कुलकर्णीने दिलं सडेतोड उत्तर

करोना विषाणूने जवळपास सर्वच देशांमध्ये शिरकाव केला आहे. भारतातही हा आकडा वाढतानाच दिसत आहे. अशा परिस्थिती जनतेचं मनोबल स्थिर ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक आवाहन केलं आहे. यामध्ये पाच एप्रिल रोजी रात्री सर्व भारतीयांनी घरातील लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं.

 

 

मोदींच्या या आवाहनावर अनेक मतमतांतरं येत आहेत. यावर टिका करणा-यांना सलील कुलकर्णीने सडेतोड उत्तर दिलं आहे. सोशल मिडियावरील पोस्टमध्ये सलील म्हणतात, ‘मेणबत्ती लावून काय होणार वगैरे खरंय..पण आज ह्यावर एकदम तर्कशुद्ध बोलणारे विद्वान दिल्लीत हजारोंची गर्दी जमली,त्यांनी नंतर डॉक्टरांना मारलं ..इंदोर मध्ये डॉक्टर आणि नर्सेस वर हल्ला झाला तेव्हा इतके शांत का होते ?का त्यांनी नेमकी काल परवा fb war casual leave घेतली होती ?
का त्यांना दोन दिवसात double झालेला नंबर आणि त्यामागचे कारण हे खटकलं नाहीये ? Really ?’ #सगळकसंसोयीने
मोदींनी यामध्ये जनतेला रस्त्यावर न उतरण्याचं आणि घरात राहूनच दिवा लावण्याचं आवाहन केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive