By  
on  

लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये या व्यक्तीसोबत राहायची नेहा पेंडसे

मराठीतली बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. मग ते बिग बॉस हिंदीतला स्पर्धेक म्हणून सहभाग असो किंवा पुण्यातील उद्योगपती शार्दूल सिंग बयाससोबतचं लग्न असो.आतासुध्दा पुन्हा ती चर्चेत येण्याचं खास कारण आहे. नेहाने नुकतंच एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी तिने आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या,ती करत  असलेल्या ट्रोलर्सचा सामना याबाबत बातचित केली.   

नेहा सांगते" मला लग्नानंतर ट्रोलर्सनी ब-.याचवेळा ट्रोल केलं. माझ्या आणि पती शार्दूल सिंग बयास याच्याबद्दल ब-याच उलट-सुलट कॉमेंट्स करुन मला ट्रोल करण्यात आलं. कधीकधी वाटायचं या लोकांना दुस-यांना अपमानित करण्यातच आनंद मिळतोय की काय,लग्नानंतर मी इतकी ट्रोल झाले आहे की, यापूर्वी मी इतकी कधीच ट्रोल झाले नव्हते.एवढंच नव्हे तर  बिग बॉस हिंदी या रिएलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतरही मी कधी इतकी ट्रोल झाले नव्हते जितकी लग्नानंतर झाले आहे. "

 

लग्नानंतरच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना,"नेहा सांगते लग्नानंतर जबाबदा-या निश्चितच खुप वाढल्या आहेत, पण तुम्हाला एक सांगते, लग्नाआधी मी शार्दूलसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.एकमेकांना आतुन-बाहेरुन  ओळखता यावं व मगच लग्नाचा निर्णय घ्यावा हाच उद्देश होता. आमच्या सवयी आम्हाला त्यामुळे खुप चांगल्या कळल्या. आता माजा संसार आहे. नवरा व घर या माझ्य्या जबाबदा-या आहेत."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

अभिनेत्री नेहा पेंडसे आणि पुण्यातील व्यावसायिक शार्दुल सिंग बयास यांचा शानदार लग्नसोहळा अलीकडेच पार पडला. 3 ते 5 जानेवारी असा हा शाही लग्नसोहळा फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत शानदार पध्दतीने पार पडला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Because it’s the last single girl kiss - Carrie Bradshaw

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

पण नेहा या नंतर ट्रोल झाली . नेहाने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की तिचा पती शार्दुल सिंग बयास याचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. शार्दुलच्या पहिल्या पत्नींचं नाव अनिता असून तीसुद्दा एक व्यावसायिकच आहे. इतकंच काय तर शार्दुलला दोन मुलीसुध्दा आहेत. रिया आणि आलिया. त्याने 2017मध्ये पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यामुळे आता नेहा ही त्याची तिसरी पत्नी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A little US before the big WE ️ @thecelebstories

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

यानंतर ट्रोलर्सनी नेहाला खुप ट्रोल केलं. कोणी तिला म्हटलं ‘शार्दुल तिचा पती नाही तर वडिलांसारखा वाटत आहे’. ‘नेहाने टोमॅटोशी लग्न केलं की काय’ अशी टिपण्णीही अनेकांनी केली. याशिवाय नेहाने शार्दुलशी पैशासाठी लग्न केल्याची कमेंटही अनेक ट्रोलर्सनी केली आहे. तेव्हा पुन्हा एका मुलाखतीत ट्रोलर्सला सणसणीत उत्तर देत म्हटलं होतं, मी तरी कुठे व्हर्जिन आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive