By  
on  

Video : रिंकू राजगुरुने घरी राहण्यासाठी चाहत्यांना दिलाय हा खास सल्ला

सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.मनोरंजन विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. 

या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी जुन्या आठवणीत रममाण झालं आहे. पण तुमच्या सर्वांची लाडकी रिंकू राजगुरु मात्र सर्वांना एक मस्त फंडा देताना पाहायला मिळतेय. रिंकू म्हणतेय,'घरी रहा आणि मस्त मस्त चित्रं काढ' हे सांगताना रिंकू स्वत:सुध्दा मस्त चित्र काढताना पाहायला मिळतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stay home. घरी रहा आणि मस्त मस्त चित्रं काढा.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकूने फुलपाखराचं खुप सुरेख पेन्सिल स्केच काढलेलं पाहायला मिळतंय.  यामुळे तुम्हाला तुमच्या टेन्शनवर नक्कीच मात करता येईल, यात शंका नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive