By  
on  

प्रिया बापटला येतीये या व्यक्तीची आठवण

सध्या करोनाच्या प्रभावामुळे संपुर्ण देश लॉकडाऊनच्या छायेत आहे. अनेक उद्योगधंदे बंद असल्याने बरेच लोक घरी आहेत. सिनेमा आणि मालिकांचं शुटिंगही बंद असल्याने कलाकार घरीच आहेत. यादरम्यान प्रिया बापट मात्र कुणाला तर मिस करत आहे. ही व्यक्ती आहे पुर्णिमा गायकवाडला. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये प्रिया पुर्णिमाच्या भूमिकेत दिसली होती. एक महत्वाकांक्षी, आत्मविश्वासू अशी ही व्यक्तिरेखा पहिल्या सीझन मध्ये पाहायला मिळाली होती. 

 

 

याशिवाय या वेबसिरीजचा पहिला सीझन प्रियाच्या ऑनस्क्रीन स्मुचसाठीही गाजला होता. अभिनेत्री गितीका त्यागी आणि प्रिया बापट यांच्यामध्ये असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे अभिनेत्री प्रिया बापटला सोशल मीडिया वर ट्रोल केलं गेलं. पण प्रियाच्या चाहत्यांनी तिच्या धाडसाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला गेला. आता दुस-या सीझनची तयारी सुरु असताना करोनामुळे या सिरीजचं शुटिंग थांबलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive