छोट्या बाळांसपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांशी माझी छान मैत्री होते : स्पृहा जोशी

By  
on  

सध्या जगभर करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर होत असून कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. 

मनोरंजन विश्वालाही याचा फटका बसला आहे. सर्व मालिका, सिनेमे, वेबसिरीज यांचं चित्रिकरण रद्द करण्यात आलं आहे. कोणी छंदात मन रमवतंय तर कोणी घरकामात व्यस्त आहे. यादरम्यान सोशल मिडीयावर स्पृहा जोशीची कृतज्ञता डायरी फार चर्चेचा विषय ठरते. अनेक स्पर्शून जाणा-या आठवणी व तिला ज्या गोष्टींबदल कृतज्ञता वाटते त्याबद्दल ती मनापासून लिहतेय. 

आजच्या पोस्टमध्ये स्पृहाने तिला लाभलेल्या सर्वांशी मिळून-मिसळून वागण्याच्या उपजत गुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

स्पृहा म्हणते, " मला लोकांशी गप्पा मारायला खूप आवडतात. सगळ्यांशी अगदी सगळ्यांशी मी मनमोकळं बोलू शकते. त्यांचं म्हणणं छान ऐकू शकते. अगदी छोट्या बाळांसपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांशी माझी छान मैत्री होते. मला त्यांच्या छोट्या छोट्या काळज्या, चिंता, आनंद, दुःख वाटून घेता येतात. समोरच्यांचं मनापासून कौतुक करता येत. माझ्यात ही समोरच्यांशी कनेक्ट करण्याची, संवाद साधण्याची ability आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे. I'm grateful for this ability to be able to empathize with people"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day13 #13 What abilities are you grateful for? मला लोकांशी गप्पा मारायला खूप आवडतात. सगळ्यांशी अगदी सगळ्यांशी मी मनमोकळं बोलू शकते. त्यांचं म्हणणं छान ऐकू शकते. अगदी छोट्या बाळांसपासून ते म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांशी माझी छान मैत्री होते. मला त्यांच्या छोट्या छोट्या काळज्या, चिंता, आनंद, दुःख वाटून घेता येतात. समोरच्यांचं मनापासून कौतुक करता येत. माझ्यात ही समोरच्यांशी कनेक्ट करण्याची, संवाद साधण्याची ability आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे. I'm grateful for this ability to be able to empathize with people - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

Recommended

Loading...
Share