Lockdown मध्ये दिसला पाठकबाईंचा हॉट अंदाज , पाहा Photos

By  
on  

करोनाने जगभर थैमान घातलं आहे.त्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन. सध्या परिस्थिती खुप गंभीर असल्याने. सर्वांना घरी राहा, सुरक्षित राहा हे आवाहन करण्यात आलं आहे. सेलिब्रिटीसुध्दा घरीच आहेत. छंदात, घरकामात रमल्यानंतर ते आपापले विविध फोटो या दरम्यान चाहत्यांसाठी शेअर करत असतात.पाठकबाईंनीसुध्दा असाच एक जबरदस्त फोटो शेअर केला  आहे.  

तुझ्यात जीव रंगलाच्या पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरचा लॉकडाऊनमध्ये एक जबरदस्त हॉट लुक व्हायरल होतोय. ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये अक्षया खुपच हॉट दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्स व लाईक्सचा जणू वर्षावच केला आहे. लॉकडाऊन आहे म्हणून मालिका नसली तरी काय झालं चाहत्यांना मात्र पाठकबाईंचं आगळं-वेगळं रुप मात्र नक्कीच पहायला मिळाला. 

नेहमीच मालिकेत साडीत वावरणा-या अक्षयाला असल्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहाणं म्हणजे चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच. 

 

सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसतोय. सर्व मालिका, सिनेमे यांचं शूटींग बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे स्वाभाविकच सर्व कलाकार आपापल्या घरी कुटुंबियांसोबत हा वेळ घालवत आहेत. कितीही वेळ आराम केल किंवा छंदात मन  रमवलं  तरी आपलं रोजचं जे रुटीन होतं त्याची नाही म्हणायला आठवण सतावतेच व पुन्हा आपण कधी त्यात परतणार ह्याचे वेध लागतात.  पण थोडं थांबूया आणि करोनाचं संकट टळल्यावर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागूया. 

Recommended

Loading...
Share