ही अभिनेत्री बनली सुगरण, बनवली रसमलाई

By  
on  

14 एप्रिलपर्यंत असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरीच आहेत. अशा वेळी अनेक मंडळी घरी बसून आवडत्या कामांचा आनंद घेताना दिसतात. अभिनेत्री प्रिया मराठे त्यापैकीच एक आहे. प्रिया मराठे आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन नेहमीच अॅक्टीव्ह असते. सतत अपडेट ती चाहत्यांपर्यंत पोहचवते.

 

 

प्रिया सध्या घरात बसून कुकिंगचा आनंद घेताना दिसत आहे. प्रियाने नुकतंच रसमलाई बनवली होती. याचे फोटोही तिने सोशल मिडियावर अपडेट केले आहेत. प्रिया म्हणते, ही पोस्ट नक्कीच शेअर करण्याजोगी आहे. आज मी पहिल्यांदाच ‘रसमलाई’ बनवली आहे. ही नक्कीच ही खुप चवदार बनली आहे. प्रिया सध्या ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share