EXCLUSIVE : महेश मांजरेकर घरात बसून कुटुंबासोबत असा घालवत आहेत वेळ 

By  
on  

सध्या कला विश्वातील कलाकारही घरात बसून या लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरही सध्या घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या मुलांसोबत एक शॉर्ट फिल्म घरातच चित्रीत केली आहे. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर घरातच बसण्याचं आवाहन ही फिल्म करते. यात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर, मानलेली मुलगी गौरी आणि स्वत: महेश मांजरेकरही आहेत. मुलगा सत्या मांजरेकरने ही फिल्म चित्रीत केली आहे.  
नुकतच महेश मांजरेकर यांनी पिपींगमून मराठीच्या लाईव्ह मुलाखतीत ते सध्या घरात बसून काय काय करत आहेत याविषयी सांगीतलं. ते म्हणतात की, “इतका मोठा ब्रेक कधीच नाही आला आयुष्यात, आत्तापर्यंत मी कधी दोन दिवस पण घरी बसलो नाही”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

लोकांना जागरुक करण्यासाठी ते म्हणले की, “ घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणतात ते उगाच नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी कंट्रोल करता आला तर जास्त चांगलं आहे. घरी बसून काय करु असा प्रश्न पडला असेल तर घरी बसून जिवंत राहा. घरात बसाल तर जिवंत राहाल. थोडे दिवस डाळ-भात खा काय फरक पडतोय? तुम्ही जर बाहेर पडताय तर तुम्ही हत्या करायला बाहेर पडताय कारण तुमच्यामुळे इतरांनाही ते पसरु शकतं.”


'वास्तव-2' या घरातच चित्रीत केलेल्या शॉर्ट फिल्मविषयी ते सांगतात की, “मुलींसोबत थोडं इम्प्रोवायझेशन सेशन करत होतो. त्यावेळी डोक्यात आलं की आता सध्या जे सुरु आहे त्याला धरून काही करता आलं तर आणि पाच मिनीटात इम्पॅक देणं गरजेचं होतं. ते करत असतानान लक्षात आलं की यात डायलॉगची गरज नाही.” 
महेश मांजरेकर यांना सध्या ते घरात बसून काय काय करताय हे विचारलं असता ते म्हटले की, “मी एक सिनेमा लिहायला घेतलाय. माझं एका नाटकाचं पण लिहायचं काम बाकी होतं. वेबसिरीजही बघतोय, कॅरम खेळतोय, पत्ते खेळतोय. रात्री मुली आणि बायको मिळून डान्स परफॉर्मन्सही करतात ते पाहतो. दररोज जेवणही बनवतो आणि रोज घरी वर्कआउटही सुरु आहे.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

sab haath bataao! swipe to see the final outcome

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar) on

महेश मांजरेकर आणि त्यांच्या मुलांनी बनवलेली शॉर्ट फिल्म तर घरात बसण्याचा संदेश देतेच शिवाय घरात बसून या वेळेचा सदुपयोगही आपली कला जोपासून कसा करता येईल याचही हे एक उदाहरण आहे.

 

Recommended

Loading...
Share