By  
on  

पाहा Video : 'सैराट' फेम रिंकू म्हणतेय घरात राहा सुरक्षित राहा

'सैराट' सिनेमातून प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही तिच्या घरी अकलुजला आहे. या लॉकडाउनमध्ये घरात असलेली रिंकू घरात कसा वेळ घालवतेय हे तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमधून सांगतेय. रिंकूने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रिंकू आनंदात घरात विविध गोष्टी करत असल्याचं पाहायला मिळतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stay home. Stay safe.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकू सध्या घर कामात आईला मदत करत आहे. शिवाय रिंकू कुकिंगही करतेय. याचे व्हिडीओही रिंकूने पोस्ट केले आहेत. रिंकूला चित्रकलेची देखील आवड असल्याने ती घरात बसून चित्रही काढतेय. मात्र नुकत्याच पोस्ट केलेल्या या व्हिडीओतून रिंकू सगळ्यांना घरात राहण्याचं आवाहन करत आहे. 

'सैराट' या सिनेमानंतर रिंकू राजगुरु 'कागर' या मराठी सिनेमात झळकली होती. शिवाय नुकताच रिंकूचा 'मेकअप' हा सिनेमादेखील प्रदर्शित झाला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive