By  
on  

लॉकडाउनमध्ये ही अभिनेत्री देतेय फिटनेस गोल्स

लॉकडाउनच्या काळात घरात बसून आरोग्य निरोग राहण्यासाठी बहुतांश लोकांचा कल आता व्यायामाकडे आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात बसून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करत आहेत. आणि स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

One more from the series! @lets_draw_light @mua_tejaswini25 @hairbyniralisoni #stayhome #fitness

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

अभिनेत्री रसिका सुनीलही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. शिक्षणासाठी परदेशात गेल्यानंतर रसिका फिटनेसकडे विशेष लक्ष देऊ लागली. त्यानंतर भारतात परतल्यानंतरही तिनं स्वत:ला फिट ठेवलं. सध्या लॉकडाउनमध्येही रसिका फिटनेसकडे लक्ष देत आहे. नुकताच रसिकाने तिचा सुपर फिट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. शिवाय या पोस्टमधून रसिका तिच्या चाहत्यांना घरात बसण्याचं आवाहन करत आहे. 

शिवाय रसिकाचे सोशल मिडीयावर बरेच फिट फोटो पाहायला मिळतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रसिका प्रचंड प्रसिद्ध झाली होती. या मालिकेतून शनाया या भूमिकेने रसिकाला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive