By  
on  

अनिकेत विश्वासराव वेबसिरीज प्लॅटफॉर्मवर,'पॅडेड की पुश अप'मधून येणार प्रेक्षकांसमोर

अनिकेत विश्वासरावने आतापर्यंत मालिका, सिनेमा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलं आहे. पण आता मात्र त्याने काहीशी वेगळी वाट निवडली आहे. ही वाट आहे वेबसिरीजची.

सध्या सगळीकडे वेबसिरीजचा बोलबाला आहे. प्रथितयश कलाकारही वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येतात. अशा वेळी अनिकेतने या प्लॅटफॉर्मची निवड केल्यास शंका नको. अनिकेत ‘पॅडेड कि पुश अप’ असं त्याच्या पहिल्या मराठी वेबसिरिजचं नाव आहे. पॅडेड कि पुश अप हे नाव वाचून अनेकांच्या भुवया उंचावणं सहाजिक आहे. कारण हे दोन्ही संदर्भ स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांशी निगडीत आहेत. अनिकेत या वेब सिरिजमध्ये अंतवस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत आहे.

विनोदी अंगाने जाणारी ही सिरिज प्रेक्षकांना खळखळून हसवेल यात शंका नाही. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या विक्रीची काहीही कल्पना नसलेला विक्रेता अनिकेतने यात साकारला आहे.

आपण काय काम करतोय ते बायको आणि सासूला कळू नये यासाठी त्याची धडपड, असं काहीसं कथानक असलेली ही वेबसिरीज पाहणं अत्यंत मनोरंजक असणार आहे. ही वेबसिरीज हंगामा प्ले वर प्रसारित होणार आहे.सर्वांनाच आता अनिकेतच्या पहिल्या-वहिल्या वेबसिरीजची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive