By  
on  

'आयुष्य आर्ट फिल्मसारखं झालं आहे, चालू आहे ते कळतंय.....पण' : प्रसाद ओक

करोनाचं जग व देशासह महाराष्ट्रात थैमान सुरुच आहे. या संकटकाळी प्रत्येकाने फक्त घरी राहूनच करोनावर मात करायचीय. त्यामुळे जो घरी बसला तो वाचला. करोनाच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर हाच एक उत्तम मार्ग आहे. फक्त आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर कण्यात आला आहे. 

करोनामुळे आपल्या समोर अनेक समस्या आल्या. अनेक समस्या अशा होत्या ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नव्हती.पण आपण त्या प्रत्येकातून काही ना काही शिकत गेलो. सेलिब्रिटीसुध्दा यादरम्यान आपापल्या घरी आहेत. किस्से व मिश्कील पोस्टमुळे नेहमीच रसिक प्रेक्षकांचा लाडका ठरलेला अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने पुन्हा एकदा मिश्कील पोस्ट करत पुन्हा एकदा हास्याची लकेर उमटवली आहे. 

प्रसादने पोस्ट केली आहे, 'आयुष्य आर्ट फिल्मसारखं झालं आहे, चालू आहे ते कळतंय...पण नक्की काय चालू आहे ते कळत नाही' या पोस्टवर चाहत्यांचा आणि सेलिब्रिटींमध्ये सोशल मिडीयावर एकच हशा पिकला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

प्रसादच्या या पोस्टवर अमृता खानविलकरलाही हसू आवता आलेलं नाही. तिनेसुध्दा हसण्याची प्रतिक्रीया केली आहे. तर भाग्यश्री मोटे, ऋजुता बागवे यांनीसुध्दा कॉमेंट्स केल्या आहेत. 

एकूणच तणावाच्या वातावरणात थोडंफार हलकं फुलकं वाटण्यासाठी नेहमीच प्रसादच्या या पोस्ट चाहत्यांच्या मदतीला येतात. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive