By  
on  

पु.लंच्या जीवनाचा वेध घेणा-या 'भाई-व्यक्ती की वल्ली'चा पाहा हा हलका फुलका ट्रेलर

संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांच्या जीवनाचा हळुवार वेध घेणा-या 'भाई-व्यक्ती की वल्ली'चा हलका-फुलका ट्रेलर नुकताच उलगडला आहे. निखळ विनोदासोबतच पु.ल देशपांडे यांच्या आयुष्यात घडलेल्या लहान-मोठ्या घडामोडींचे बारकावे टीपण्याचा प्रयत्न यात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पु.ल देशपांडेंना पाहण्यासाठी  सारेच उत्सुक आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सिनेमाचा शानदार ट्रेललर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह सिनेमातील कलाकारांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

सागर देशमुख आणि सक्षम कुलकर्णी सिनेमात पु.लंची व्यक्तिरेखा साकारतायत. यांच्यासोबतच इरावती हर्षे. सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिगदर्शित आणि निर्मित व वायाकॉम मोशन पिक्चर्सनिर्मित 'भाई-व्यक्ती की वल्ली' हा सिनेमा येत्या 4 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

https://youtu.be/FbcKVZ1IPDw

 

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पु. ल. देशपांडे यांची जीवनगाथा आपण यापूर्वी फक्त ऐकल्या आहेत. पण त्या आता मोठ्या पडद्यावर साकारुन पु.लंचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive