पतीला भेटण्यासाठी ही अभिनेत्री चक्क वडोदरा ते मुंबई स्वत: ड्राईव्ह करत येणार

By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या भलतीच खुष आहे. कारण तिला आता पती अभिषेकला भेटता येणार आहे. 4 मे पासून देशभरातील लॉकडाऊन काही अंशी शिथील झालं आहे. अनेकांना विशेष परवानगी घेऊन प्रवास करता येणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेचाही समावेश यामध्ये आहे. लॉकडाऊनमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहरे बडोद्याला म्हणजेच माहेरी होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#comingbacktomumbai for you @abhishekjawkar

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

लॉकडाऊन सुरु असल्याने तिला मुंबईला जाता येत नव्हतं. पण आता थोड्याशा शिथिलतेनंतर तिला जाण्यास परवानगी मिळाली. प्रार्थना आणि तिची पेट फिल्मी दोघीही मुंबईच्या दिशेने निघाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रार्थना स्वत: ड्राईव्ह करणार आहे. प्रार्थनाने यावेळी एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये प्रार्थना तिच्या या प्रवासाबाबत, मिळालेल्या परवानगीबाबत सर्व माहिती चाहत्यांशी शेअर करणार आहे.

Recommended

Loading...
Share