By  
on  

Exclusive : गॅंगस्टर अरुण गवळीची लेक या मराठी अभिनेत्यासह उद्या अडकणार विवाहबंधनात

गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची कन्या योगिताच्या साखरपुड्याबद्दल यापूर्वी पिपींगमून मराठीने तुम्हाला सांगितलं होतं. डिसेंबर २०१९ रोजी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांनी साखरपुडा केला होता. २९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे लग्न उद्या पार पडेल. याबाबतचे एक्सक्ल्युझिव्ह वृत्त पिपींगमूनच्या हाती आले आहे. 

मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा  मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थित पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम  असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. ते सध्या पॅरॉलवर आहेत. शिवसेनेच्या कमलाकर जामसांडेक यांच्या खुनप्रकरणी त्यांना २००७ मध्ये अटक झाली होती. 

सूत्रांनी पिपींगमूनला दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड व मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार या दिमाखदार लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार होते, परंतु करोना संकटामुळे तसा दिमाखदार सोहळा आता होऊ शकणा नाही. 

  या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील, असं सांगण्यात येत आहे. तसंच पोलिसांकडून मंगळवारी अधिकृत परवानगीचा मेल आल्यानंतरच ८ मे ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. 

अरुण गवळींचा जावई अक्षय वाघमारे हे मराठी सिनेसृष्टीतले अजरामर विनोदवीर दादा कोंडके यांच्या कुटुंबातून आहे.  अक्षय अलीकडेच रिलीज झालेल्या फत्तेशिकस्त या सिनेमात झळकला होता. याआधी त्याने ‘ती  फुलराणी’ या मालिकेत शौनकची भूमिका साकारली होती. तर योगिता एक स्वयंसेवी संस्था चालवते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive