By  
on  

रसिका सुनिलने बोल्ड फोटो पोस्ट केला पण नेटक-यांना तंंबी दिली

गुरुनाथची बेबी-बच्चा असलेली नखरेल शनाया म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. रसिकाने 'माझ्या नव-याची बायको' ह्या मालिकेला रामराम ठोकला असला तरी ती नेहमीच च्चेत असते, ती सोशल मिडीयावरील तिच्या बोल्ड फोटोंमुळे .अभिनयातील अदाकारीसोबतच रसिका आपल्या फिटनेसबाबतीतसुध्दा प्रचंड जागरुक असल्याचं पाहायला मिळतं. 

दरम्यान अनेक दिवसांपासून रसिका तिचे बिकनीमधील सुपर हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सिनेसृष्टीतील कलाकारांसह सर्व चाहते या जबरदस्त फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत असतात. सध्या सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातलं अंतर खुपच कमी झालं आहे. अनेकदा सेलिब्रिटींना अर्वाच्च्य भाषा, शिवीगाळ किंवा अश्लील कॉमेंट्सना सामोरं जावं लागतं. बहुधा तसाच काहीसा अनुभव रसिकालासुध्दा आला असेल. 

म्हणूनच रसिकाने तिचा बिकनीतला बोल्ड फोटो पोस्ट करत नुकतीच नेटक-यांना चांगलीच तंबी दिली आहे. ती पोस्टमध्ये म्हणते," मला हे लिहावं लागतंय ते फार त्रासदायक आहे, तरी लिहते...अर्वाच्च्य व अश्लील कॉमेंट्सना इथे थारा मिळणार नाही..त्या डिलीट करण्यात तर येतीलच..आणि अकाऊंट रिपोर्टही करण्यात येईल,"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive