आता ठरली या जोडीच्या लग्नाची तारीख, पाहा कोण आहे ही जोडी

By  
on  

मालिकेतील कथानकात आवडत्या जोडीचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा असते. हा मालिकेच्या चाहत्यांसाठी सगळ्यात आनंददायी सोहळा असतो. अशाच एका जोडीचं शुभमंगल होणार आहे. ही जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांत.
मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ईशा आणि विक्रांतची प्रेमकहाणी सुरु झाल्यापासून मालिकेचा टीआरपी देखील दुस-या स्थानी आहे.


त्यामुळे ईशा आणि विक्रांतच्या लग्नाचा एपिसोड लवकरच प्रसारित केला जाणार आहे. १३ जानेवारीला ईशा आणि विक्रांत यांचं शुभमंगल एक तासाच्या एपिसोडद्वारे दाखवलं जाणार आहे.


ईशा आणि विक्रांतच्या वयामध्ये असलेलं अंतर ही त्यांच्या प्रेमातील आणि लग्नाच्या वाटेवरील सर्वात मोठी अडचण आहे. त्यामुळे ईशाच्या घरच्यांना विक्रांत सरंजामे कशाप्रकारे विश्वासात घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
याशिवाय झेंडे, मायरा, टिल्लू यांच्याद्वारे निर्माण केलेले अडथळे पार करत विक्रांत आणि ईशाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडतं का हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share