अमेरिकेत राहणा-या पुणेरी नव-यासाठी मृणाल दुसानिसची वाढदिवसानिमित्त हटके पोस्ट

By  
on  

छोट्या पडद्यावरच्या मालिकाविश्वातली आघाडीची गोड व गुणी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. सध्या सुखाच्या सरींनी हे मन बावरे या तिच्या मालिकेला लॉकडाऊनमध्ये प्रेक्षक खुप मिस करत आहेत. मृणाल सध्या शूटींग बंद असल्याने आपल्या नाशिकच्या घरी लॉकडाऊनचा काळ आई-बाबांसोबत घालवतेय. तर तिचे पती निरज मोरे हे परदेशात वास्तव्यास आहेत. मृणालचे पती निरज यांचा आज वाढदिवस आहे व प्रत्यक्ष भेटता येत नसलं तरी त्यांना मृणालने मात्र खास पुणेरी स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मृणाल इन्स्टाग्रामवर हटके पोस्ट करत म्हणते," अमेरिकेत राहूनही मनात ‘सदाशिव पेठ’ जपणारया माझ्या पुणेरी नवरयाला वाढ़दिवसाच्या शुभेच्छा ..... ( मराठी टाइपिंगचा हटट)...", तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्स व लाईक्सचा अक्षरश: वर्षाव केला आहे. 

मृणाल व निरज याचं हे अरेंज-मॅरेज असलं तरी हे खुपच रोमॅन्टीक व मेड फॉर इच अदर कपल आहे. त्यातून लॉंन्ग-डिस्टन्समध्ये असूनही त्यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही...असो..या लक्ष्मीनारायणाच्या जोडीला सहजीवनासठीसुध्दा खुप खुप शुभेच्छा !

 

Recommended

Loading...
Share