केदार शिंदे म्हणतात, ‘Social distancing चा पहीला प्रयत्न माझ्या या चित्रपटात झाला’

By  
on  

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक दर्जेदार मराठी सिनेमा म्हणजे अग बाई अरेच्चा 2. या सिनेमातील हटके कथानकामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या सिनेमातील नायिका काही कारणामुळे समोरच्या व्यक्तीला स्पर्श करू शकत नसते. त्यामुळेच तिला अगदी पतीसोबतही सोशल डिस्टंसिंग पाळावं लागतं. अशी भन्नाट कथा या सिनेमाची आहे.

 

 

या सिनेमाला रिलीज होऊन आज पाच वर्ष पुर्ण झाली. या सिनेमाची आठवण केदार यांनी शेअर केली आहे. केदार आपल्या कॅप्शनमध्ये म्हणतात, ‘ Social distancing चा पहीला प्रयत्न माझ्या या चित्रपटात झाला. आज चित्रपटाला ५ वर्ष झाली.’ या सिनेमात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. यशिवाय प्रसाद ओक, शिवराज वायचळ, भरत जाधव यांच्याही भूमिका होत्या.

Recommended

Loading...
Share