सुबोध भावे म्हणतो,"ध्यानात " असताना त्यांना डिस्टर्ब करू नका !

By  
on  

सध्या करोना संकटामुळे  सर्वचजण घरी आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे मोकळा वेळ आहे व मोकळा वेळ मिळाल्याने आपसूकच भन्नाट कल्पनाशक्तीला वाव देण्यात येत आहे. तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा याला अपवाद नाहीत. आता सुबोध भावेचंच पाहा ना, पुन्हा एकदा एक धम्माल पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्याने खळखळून हसवलंय. 

सुबोधने नुकताच आल्याचा ( आलं जे आपण स्वयंपाकात वापरतो)...हाहाहाहाहाहाहा...फोटो फोस्ट करत म्हटलंय, आत्ता "...." ध्यानात!  त्यामुळे "ध्यानात " असताना त्यांना डिस्टर्ब करू नका. एकूणच सुबोधची ही मिश्कील पोस्ट पाहून हसू नक्कीच तुमच्या चेह-यावर उलटणार यात शंका नाही. 

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील कामं ठप्प झाली आहे. सगळ्या प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने  कलाकार घरातच आहेत, मात्र तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते सतत चाहत्यांच्या संपर्कात राहतायत , त्यांचे मनोरंजन करतायत हे कौतुकास्पद. 

 

Recommended

Loading...
Share