By  
on  

गुलाबाची कळी तेजस्विनी पंडीतच्या स्ट्रगलची मन हेलावून टाकणारी कहाणी जरुर वाचा

झमगत्या चंदेरी दुनियेत स्व:ताचं स्थान निर्माण करणं हे वाटतं तितकं कधीच सोप्पं नसतं. यासाठी खडतर प्रवासातून जावं लागतं. मेहनत, जिद्द व कष्ट करायची तयारी असेल तरच आपण तिथपर्यंत पोहचू शकतो.  कुठलीही गोष्ट सहजासहजी कोणालाज मिळत नाही. त्यामुळे स्ट्रगल हा कोणालाच चुकलेला नाही.

मराठी सिनेसृष्टी गाजवणारी आपली सर्वांची लाडकी गुलाबाची कळी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आज सर्वांची लाडकी आणि सौंदर्यवती गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मी सिंधूताई सकपाळ ह्या सिनेमामुळे तिला खरी ओळख मिळाली व तिचा यशस्वी प्रवास सुरु.  झाला. पण इथपर्यंतचा तिचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता. त्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. नुकतंच आपल्या स्ट्रगलच्या दिवसांतील आठवणींना तेजस्विनीने  उजाळा दिलाय.

एका टॉक शोमध्ये तेजस्विनीने मन हेलावून टाकणारी आपल्या स्ट्रगलची कहाणी शेअर केली. एक असा कठीण काळ तिच्या आयुष्यात आला, मात्र त्यावेळीसुद्धा हार न मानता आपला स्ट्रगल तिने सुरूच ठेवला. एकवेळ अशीही होती की तिच्या घरात जेवण्यासाठीसुध्दा पैसे नव्हते. त्यामुळे  बिस्किटं खाऊन तिने दिवस काढले. इतकंच नाही तर पैसे नसल्याने वीज बीलही थकले होते. त्यामुळे त्यांची वीज कापण्यात आली. त्यामुळे ते दिवस आम्ही अंधारातच राहायचो,असं तेजस्विनी सांगितलं होतं.

त्यानंतर तिने हळूहळू सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली.  काही छोट्य़ा मोठ्या जाहिराती करुन पैसे मिळविले आणि थकीत वीजबील भरलं. हे सांगताना तिचे डोळे भरुन आले होते आणि दुसरीकडे आपण सर्व अडचणींवर मात करत आज यशस्वी अभिनेत्री असल्याचा खरा आनंदही तिच्या चेह-यावर दिसून येत होता.

Recommended

PeepingMoon Exclusive