यांच्या मैत्रीला झाली १० वर्ष, मैत्रिणीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

ही अभिनेत्री मैत्रिण असली तरी कार्यक्रमाच्या मंचावर तिची खिल्ली उडवायची एकही संधी या महाराष्ट्राच्या हास्यसम्राज्ञीने सोडली नाही. जेव्हा जेव्हा ती आली तेव्हा तेव्हा तिने तिची ुप मजा घेतली. अर्थातच मैत्रिण असल्याने सर्वच सवयी, सिक्रेट या गोष्टी माहित होत्या, आम्ही सांगतोय...श्रेया बुगडे व अभिनेत्री तेजस्विनी पंडीतबद्दल. 

आज अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचा वाढदिवस. त्यानिमित्त अभिनेत्री श्रेया बुगडेने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मैत्रिला तब्बल १० वर्ष पूर्ण झाली  आहेत. एकमेकींचा हात धरुन एकाच दिशेने आपली वाटचाल सुरु आहे. हे निखळ हास्य असंच राहू दे अशा शब्दांत श्रेया व्यक्त झाली आहे. 

वाढदिवसानिमित्त तेजस्विनीवर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण बेस्ट फ्रेंडकडून मिळालेल्या या शुभेच्छा तिच्यासाठी खास आहेत. 

 

Recommended

Loading...
Share