निमकरांनी कळवला होकार, तुला पाहते रे मध्ये वाजणार विक्रांत-ईशाच्या लग्नाचे सनई-चौघडे

By  
on  

डेली सोपचा चाहतावर्ग घराघरात असतो. मालिकांमधील व्यक्तिरेखांशी प्रत्येकाचं असं खास नातं बनलेलं असतं. मालिकेतील नायक-नायिकेच्या जोड्यांनाही लोकप्रियता मिळते. अशीच लोकप्रिय जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांतची.

तुला पाहते रे या मालिकेतील ईशा आणि विक्रांत या जोडीची प्रेमकहाणी रसिकांना आवडली आहेच. पण या जोडीचं लग्न कधी होणार याची प्रतिक्षाही आहे. अनंत अडचणींमधून मार्ग काढत ईशा आणि विक्रांतला त्यांचं प्रेम गवसलं आहे.

[video width="640" height="360" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/zeemarathiofficial_49500287_225356258247393_8093881460043284480_n.mp4"][/video]

रसिकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुड न्युज आहे. कारण ईशाच्या बाबांनी या लग्नाला परवानगी दिली असून एक जानेवारीला ईशा आणि विक्रांतचा साखरपुडाही पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता ईशा आणि विक्रांतच्या सनई चौघड्यांचा प्रोमो कधी रिलीज होईल याची उत्सुकताही लागली आहे.

Recommended

Loading...
Share