By  
on  

बंगाली देवदास आता मराठीत बोलणार, दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचा नवा सिनेमा

देवदास हे नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर आतापर्यंतच्या सिनेमांची यादी तरळून जाते. शरदचंद्र चट्टोपाध्याय लिखित या कादंबरीने आजवर अनेक दिग्दर्शकांना वेड लावलं. त्यामुळेच आजवर अनेक भाषांमध्ये या सिनेमाची निर्मिती झाली आहे. प्ण मराठी सिनेसृष्टीने मात्र आतापर्यंत या अजोड कलाकृतीला स्पर्श केला नव्हता. पण आता ती वेळ आली आहे. आता देवदास या नायकाच्या कथेला मराठी दिग्दर्शकाचा परिसस्पर्श लाभणार आहे. दिग्दर्शक शेखर सरतांडेल हे देवदास या बंगाली भाषेतील कादंबरीवर मराठी सिनेमा बनवणार आहेत. शेखर यांनी यापूर्वी ‘एक अलबेला’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
या सिनेमात देवदास, पारो आणि चंद्रमुखी यांच्या भूमिका कोण करणार हे स्पष्ट झालं नाही. या सिनेमाची कथा सुनील पातवळेकर यांनी लिहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive