By  
on  

लाडकी सुनबाई मृण्मयीने चक्क सास-यांनाच शिकवलं पाऊट !

सोज्वळ आणि सालस व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.  मालिका, सिनेमा, रिअ‍ॅलिटी शोमध्ये अभिनयात स्वत:च्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर मृण्मयी आता दिग्दर्शनाकडे वळली आहे. पण लॉकडाऊनमध्ये मृण्मयी सध्या घरी आहे. कुटुंबासोबत क्वालिटी टाईम शेअर करतानाच तिने एक खास पोस्टही शेअर केली आहे.

 

 

मृण्मयीने तिच्या सास-यांबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘माझे सासरे म्हणतात- माणसांनी शिकण्याची वृत्ती कोणत्याही वयात सोडली नाही पाहिजे... !! मग मी त्यांना 'पाऊट' शिकवला...’ पती स्वप्नीलच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मृण्मयीने हा फोटो शेअर केला आहे. 
मृण्मयीने ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात  सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Recommended

PeepingMoon Exclusive