By  
on  

वीणा जगतापने शेअर केली या खास भूमिकेची आठवण

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळाली. साधी, सोशिक, तत्वांशी ठाम असलेली राधा यात वीणाने साकारली होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सचित पाटीलही दिसला होता.

 

 

राधा आणि प्रेमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडली होती. या मालिकेने वीणाला घरोघरी पोहचवलं. या भूमिकेची आठवण शेअर करत वीणा म्हणते, ‘हीने मला ओळख दिली.. ही माझी आवडती आहे.. ही माझ्यातली " ती " मी आहे जी मला खुप काही शिकवून गेली. ही सुरुवात आहे , अजुन भरपुर काही शिकायचं आहे आयुष्यात..... 
वीणाशिवाय या मालिकेत कविता लाड– मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपराजित हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Recommended

PeepingMoon Exclusive