आणि संतोष जुवेकरला भेडसावतेय ही चिंता , जाणून घ्या

By  
on  

नेहमीच भन्नाट पोस्टमधून चाहत्यांच्या संपर्कात राहणारा सर्वांचा लाडका संत्या म्हणजेच अभिनेता संतोष जुवेकरने नुकंतच एक मिश्कील पोस्टमधूून वास्तव मांडलं आहे. त्याला ही चिंता भेडसावतेय आणि त्याच्यासारखी आपल्यालासुध्दा ती भेडसावेल. 

आज करोनामुळे जग संपूर्ण बदललं आहे आणि पुढेही ते खुप बदलणार आहे. संतोष आपला पोस्ट वर्कआऊट सेल्फी शेअर करत  म्हणतो, "Lockdown सुरु झाल नंतर ते वाढतच गेल आणि covid19 positive रुग्णाची संख्या पण वाढत गेली आणि चिंता पण वाढतेच आहे......... कमी झालय ते वजन आणि बँक बॅलन्स...आयची जय ह्या कोरोनाच्या.......safe in home but unsafe in future......"

आज लॉकडाऊनमुळे सर्वांकडेच भरपूर वेळ आहे, आपसूकच कल्पनाशक्तीलासुध्दा भरपूर वाव मिळतोय. त्यात आपल्या मराठी कलाकारांच्या भन्नाट पोस्ट म्हणजे फुल ऑन एन्टरटेन्मेन्टचा डोस असतो,पण संतोषची ही पोस्ट वास्तव मांडून विचार करायला भाग पाडते. 

Recommended

Loading...
Share