By  
on  

या लहान छकुलीला ओळखलत का ? पाहा लहानपणीची ही खास आठवण केली शेयर

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोकं त्यांच्या जुन्या  आठवणींना उजाळा देत आहेत. आणि यासाठी सोशल मिडीया हा दुवा ठरतोय. सोशल मिडीयावर थ्रोबॅक किंवा लहानपणीचे फोटो पोस्ट करून त्या जुन्या आठवणींमध्ये काही रमत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींचा जास्त समावेश आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

1993 चे एव्हरेस्टवीर श्री. राजीव शर्मा, डिकी डोल्मा आणि राधादेवी यांचेबरोबर एव्हरेस्ट मोहीमेची चर्चा करताना बाल गाैतमी... We always got a chance to meet these and many more great personalities and Nature lovers because of my Dad vivek Deshpande ♥️Remembered this because its been 67years since Sir Edmund Hillary and Sherpa Tenzing 1st climbed #mounteverest on 29th May’1953 #mountaineering #mountaineers #mounteverest #everestor #trekking #naturelover #nature #greatpeople #mountainlife #mountain #mountainpeople #everestbasecamp

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial) on

अभिनेत्री गौतमी देशपांडेही तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमली आहे. लहानपणीची एक खास आठवण तिने शेयर केली आहे. लहानपणी काही दिग्गज व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी गौतमीला वडिल विवेक देशपांडे यांच्यामुळे मिळाली होती. तेव्हा 1993 ची ही खास आठवण तिने पोस्ट केली आहे. त्यावेळी एव्हरेस्टवीर   श्री. राजीव शर्मा, डिकी डोल्मा आणि राधादेवी यांना गौतमी भेटली होती. या पोस्टमध्ये गौतमी लिहीते की, “1993 चे एव्हरेस्टवीर श्री. राजीव शर्मा, डिकी डोल्मा आणि राधादेवी यांचेबरोबर एव्हरेस्ट मोहीमेची चर्चा करताना बाल गौतमी. आम्हाला नेहमीच मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी वडिल विवेक देशपांडे यांच्यामुळे मिळाली होती. हे आठवलं कारण 29 मे, 1953मध्ये पहिल्यांदाच एव्हरेस्ट पर्वत चढणारे एव्हरेस्टवरी  सर एडमंड हिलरी आणि शेर्पा टेंझिंग यांना नुकतीच 67 वर्षे पूर्ण झाली आहेत.”
ही पोस्ट वरुन गौतमीचा तिच्या मनात पर्वतारोहण करणाऱ्या आणि एव्हरेस्टवीर यांच्या प्रती असणारा आदर  पाहायला मिळतोय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive