By  
on  

आणि हा व्हिडीओ पाहून सुमीचं हसून हसून पोट दुखू लागलं , तुम्हीसुध्दा एकदा पाहाच

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व घरी आहेत व प्रत्येकाकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग कोण कसा करेल याचा काहीच नेम नाही. नुकताच मिसेस मुख्यमंत्री फेम समरची सुमी हिने एक व्हिडीओ शेअर केला आणि हसून हसून तिचीच पुरेवाट लागली. तिच काय...तुम्ही पण हा व्हिडीओ पाहून पोट दुखे पर्यंत हसाल...नक्की काय आहे या व्हिडीओत असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. 

लॉकडाऊनमध्ये मीम्सला उधाण आलं आहे, त्याचाच व्पहिडीओ रिणाम म्हणून एका इंग्रजी गाण्याला मिसेस मुख्यमंत्री मालिकेचं टायटल सॉंग एडीट करुन लावल्याने एकच धम्माल उडलीय. हा व्हिडीओ सुमी फेम अमृता धोंडगेने शेअर करत, कसं सुचतं हे?......असं विचारत जमलंय बरं का म्हणून दिलकुलास दादसुध्दा दिलीय. 

 

मी मिरवणार...सर्वांची जिरवणार...या गाण्यावर सुमी ताल धरते आणि सर्वच कौतुकाने पाहतात. पण या व्हिडीओत तिच्या गाण्यावर परदेशी ललनांनी धरलेला ताल पाहून हसू आवरताच येत नाही. अनेक चाहत्यांनी सुमीने  शेअर केलेल्या या व्हिडीओवर कोतुकाचा वर्षाव करत तुफानी प्रतिक्रीया दिल्या आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive