By  
on  

सिध्दार्थसारख्या तुमच्यासुध्दा पहिल्या पावसातल्या या आठवणी ताज्या नक्कीच झाल्या असणार

तो रिमझिम बरसणारा पाऊस ... तो दरवळणारा मातीचा सुंगध..सर्वत्र काळोखं ढगाळ वातावरण...अशा आल्हादायक वातावणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहतात. नुकतंच पहिल्या पावसाचं आगमन झालं आहे. लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरी आहेत आणि पावसाचा मनोसोक्त आनंद लुटतायत. पण या पावसाच्या सरींसोबतच आपल्या काही जुन्या आठवणीसुध्दा ताज्या होऊ लागल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अभिनेता सिध्दार्त चांदेकरने त्याच्या शालेय जीवनातल्या पावसाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिध्दार्थ म्हणतो, जून महिना आला की पाहिले पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात जाऊन 'सुदर्शन' च्या वह्या आणायच्या. घोटीव कागदाचा रोल घ्यायचा. आवडते स्टिकर घ्यायचे...आणि घरी जाऊन पुढच्या इयत्तेच्या वह्या सजवून, कोऱ्या करकरीत पुस्तकांचा सुवास घ्यायचा. पहिल्या पावसासोबत ह्या आठवणी परत आल्या.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive