By  
on  

पाहा Video : ये राष्ट्र पुन: खडा होगा..”, संकर्षण क-हाडेची स्फूर्तीदायी कविता

सध्या आपल्या देश विविध संकटांनी चारी बाजूंनी घेरला गेला आहे. आपण करोनाच्या कचाट्यात सापडलो असतानाच हे चक्रीवादळाचं आणखी एक मोठं संकट घोंघावतंय तर टोळधाडीचं नुकसान सत्र सुरुच आहे. तर तिथे सीमेवर आपले सैनिक शत्रूराष्ट्रांच्या सैन्याशी अहोरात्र झुंज देत आहेत. संकटं एकामागोमाग येत आहेत. कितीही मनाची समजूत घातली तरी सध्या फक्त नकारात्मक चित्रणच सर्वत्र पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर मराठीतला उत्तम निवेदक आणि अभिनेता संकर्षण क-हाडे याने या वातावरणात मनोधैर्य वाढवणारी एक कविता नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट केली आहे. 

 ‘ये राष्ट्र पुन: खडा होगा..’ असे या कवितेचे बोल असून सोशल मीडियावर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे सकारात्मक उर्जा व वातावरण तायार व्हायला बरीच मदत मिळतेय. व्हिडीओची सुरुवात करताना संकर्षण म्हणतो, “जे घरबसल्या तुम्ही पाहताय, ते मी पण पाहतोय. आधी करोना आला, मग अम्फान वादळ आलं, मग आता निसर्ग आहे, तिकडे सीमेवर चीन बसलाच आहे. देशाच्या मागे या सगळ्या गोष्टी एकदम अशा का येतायत हे कळत नाहीये. पण हे सगळं घडत असताना मनात एक विचार सतत येतोय की ये राष्ट्र पुन: खडा होगा,”  

संकर्षणच्या या स्फुर्तिदायी कवितेवर नेटक-यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive