By  
on  

आदिनाथ कोठारे म्हणतोय, ‘काही वादळं घेऊन जाणारी तर काही देऊन जाणारी असतात’

आज सगळ्यांनीच धास्ती घेतली होती निसर्ग या वादळाची. महाराष्ट्रात हे वादळ प्रवेश करणार असल्याने अनेकांनी खबरदारीचा उपायही योजला होता. पण निरागस जिजाने मात्र या पावसाचा आनंद घेतला. आदिनाथने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये पावसात भिजताना त्याच्या हातात जिजाचा इवला हात दिसत आहे. हे दोघंही बापलेक पावसांच्या सरींमध्ये भिजताना दिसत आहेत.

 

 

या पोस्टला कॅप्शन देताना आदिनाथ म्हणतो, ‘काही गोष्टी आपल्या हातात असतात. काही गोष्टी आपल्या असतात. काही वादळं धेऊन जाणारी तर काही देऊन जाणारी असतात. आपण भिजायचं. चिंब होऊन जगायचं.’ आदिनाथ आता कबीर खान दिग्दर्शित ‘83’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो दिलीप वेंगसरकरांच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive