By  
on  

अशोक सराफ यांनी निवेदिता यांना दिला होता हा आर्शिवाद, वाचा हा रंजक किस्सा

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार जोडी. या जोडीचे सिनेमे आणि त्यांची केमिस्ट्री ही आजही रसिकांना भुरळ पाडते. या जोडीचे सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी धम्माल ही प्रत्येक वेळेस येते. आज अशोक सराफ यांचा वाढदिवस. यानिमित्त तुम्हाला जाणून घ्यायल नक्कीच आवडेल की या जोडीची पहिली भेट कशी झाली. 

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी आपल्या प्रेमाचा हा रंजक किस्सा उलगडला. नवरी मिळे नव-याला हा या दोघांचा पहिलाच सिनेमा. पण त्यात दोघांचे एकमेकांसोबत एकत्र शॉट नव्हता. त्यामुळ ेदोघंही एकही शब्द एकमेकांशी बोलले नाहीत. तर मजा म्हणजे या दोघांनी दुसरा सिनेमा केला तु सौभाग्यवती यातही दोघं एकमेकांशी  एकही शब्द बोलले नाही. तर यानंतर या दोगांनी सुपरहिट धुमधडाका या सिनेमात एकत्र काम केलं. पण यातही त्यांचं एकत्र एकच सीन होता...एकच शॉट होता, ज्यात निवेदिता यांना अशोक सराफ यांच्या पाया पडायचं होतं, त्या पाया पडल्या... त्यावर अशोक सराफ यांनी त्यांना आर्शिवाद देत सीनचं वाक्य म्हटलं... तुला इच्छित वरप्राप्ती होवो. 

या आर्शिवादाचा किस्सा सांगताना अशोक सराफ खळखळून हसून म्हणतात. मला भविष्यातलं काही माहित नव्हतं....नाहितर मी तो आर्शिवाद बदलला असता...त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive