By  
on  

सिध्दार्थ जाधव म्हणतो,'अशोक मामा तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली हे माझं भाग्यंच'

आज मराठी सिनेसृष्टीच्या लाडक्या मामांचा म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस. अशोक सराफ यांच्यावर आज सर्वत्र शुभेच्छांचा  वर्षाव होत आहे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीचा एनर्जी मॅन सिध्दार्थ जाधवने त्यांना खास स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. 

सिध्दार्थ म्हणतो, अशोक मामा मला तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करायची संधी साडे माडे तीन या सिनेमात मिळाली हे माझं भाग्यंच. तर माझा नवरा तुझी बायको सिनेमाच्या प्रिमियरला तुम्ही प्लाझा थिएटरबाहेर तुम्ही मला कौतुकाची थाप दिली ती मी कधीच विसरु शकत नाही. माझ्या विनोदाचं टायमिंग अचूक असल्याचं तुम्ही म्हणालात, मी भरुन पावलो. तुम्ही इंडस्ट्रीचे मामा कधी झालात ते कळलंच नाही. माझ्या वाढदिवसाला तुम्ही आवर्जुन मला फोन करुन शुभेच्छा देता खुप छान वाटतं. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday "Ashok mama " . . #happybirthdayashoksaraf

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

सिध्दार्थने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं, की टअशोक मामा तुम्ही आम्हाला सतत प्रेरणा देत राहा...असाच तुमचा हात पाठीवर असू देत'

Recommended

PeepingMoon Exclusive