By  
on  

त्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झाली भावूक

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक नव्या गोष्टी करत आहेत तर काही त्यांचे छंद जोपासत आहेत. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काही लोक पुस्तकही वाचत आहेत. 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही लॉकडाउनमध्ये वाचन करत आहे. शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी सोनाली या दरम्यान वाचत होती.  खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मागोवा ही कादंबरी घेते.  सोनालीने ही कादंबरी वाचून पूर्ण केली आहे. मात्र या पुस्तकाच्या शेवटी शेवटचं पान वाचत असताना सोनाली भावूक झाली.

 

हे शेवटचं पान वाचत असताना सोनालीने व्हिडीओ शूट केला आहे. आणि त्या ओळी वाटत असताना सोनालीचा कंठ दाटून आला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “आज शेवटचं पान वाचतेय...मला कुठल्याच गोष्टीचा शेवट होताना आवडत नाही...खूप त्रास होतो...अगदी पुस्तकाचाही....त्यात कर्णाचा..”

सोनाली कुलकर्णी ही एक संवेदनशील अभिनेत्री आहे. सध्या वाचनात रुची निर्माण झाल्याने ती विविध पुस्तकही वाचत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive