By  
on  

या मराठी अभिनेत्रीचं सुरेख स्केच पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात!

सध्या क्वारंटाईनमुळे प्रत्येकाकडेच खुप वेळ आहे, अनेक जण छंदात जुन्या आटवणीत रममाण झाले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींना आर्टिस्ट चाहते हे त्यांच्या स्केचची त्यांना सुरेख भेट देत आहेत. त्यामुळे आपसूकच दोघांच्याही कलेचा सन्मान होतो आहे. 

खुलता कळी खुलेना मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली डिंपल क्वीन अभिनेत्री मयुरी देशमुखला   तिच्याच स्केचची सुरेख भेट एका चाहतीने दिली. ही सुंदर भेट पाहून मयुरी हरखून तर गेलीच आणि ते स्केच तिने सोशल मिडीयावर शेअर करत त्या आर्टिस्ट चाहतीला शुभेच्छासुध्दा दिल्या.

अनेकांनी मयुरीच्या या सुरेख स्केचवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच या  स्केचमध्ये मयुरीची गालावरची खळी अधोरेखित झाल्याने हे स्केच चाहत्यांना भलतंच आवडलंय. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive