मधुरा वेलणकर म्हणते, ‘तुला काका म्हणणारी मी एकटीच !’

By  
on  

विनोदाचे बादशहा समजले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीमुळे अशोक सराफ आजही अनेक सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करत आहेत.  विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता यांचा अचूक संगम अशोक सराफ यांच्या अभिनयात आहे. 

 

 

अशोक सराफ यांना फॅन्स ‘अशोकमामा’ या खास नावाने ओळखतात. पण अशीही एक अभिनेत्री आहे जी अशोक यांना ‘अशोककाका’ म्हणते. अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने नुकतीच ही बाब शेअर केली. अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मधुरा म्हणते, ‘ हॅपी बर्थ डे अशोककाका. तुला काका म्हणणारी मी एकटीच ! खुप प्रेम.’ मधुरा वेलणकर आणि अशोक सराफ यांनी  ‘एक डाव धोबीपछाड’, ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

Recommended

Loading...
Share