‘मुंराबा’ सिनेमाला दोन वर्षं पुर्ण झाल्यानिमित्त असं झालं टीमचं रियुनियन

By  
on  

फ्रेश चेहरे, फ्रेश कथानक आणि सिनेमाची हाताळणीही फ्रेश असलेला मुरांबा सिनेमा अनेकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमात अमेय वाघ, सचिन खेडेकर, चिन्मयी सुमीत आणि मिथिला पालकर हे कलाकार आहेत. आजच्या पिढीची, त्यांना समजून घेणाऱ्या आजच्या पालकांची गोष्ट या सिनेमात असल्याने तो अनेकांना रिलेट वाटू शकतो. 

 

 

या सिनेमाने नुकतीच दोन वर्षं पुर्ण केली आहेत. यावेळी या सिनेमाच्या कास्टचं व्हर्च्युअल गेट टुगेदर घडवलं अमेय वाघने. अमेयने त्याच्या युट्युब चॅनेलवरून या सिनेमातील कलाकारांच्या आठवणी शेअर केल्या. यावेळी ऑडिशनपासूनच्या आठवणी कलाकारांनी शेअर केल्या आहेत. या सिनेमातील अमेय आणि मिथिलाचं बाँडिंगही अनेकांना आवडलं.

Recommended

Loading...
Share