प्रसाद ओकने व्यक्त केली ही चिंता, वाचा सविस्तर

By  
on  

आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा लॉकडाऊन काळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. तर कोणी घरी नवनवीन कल्पना शक्तीला वाव देत भन्नाट आयडियाज काढत आहेत. आपल्या विनोदी कल्पनाशक्तीमुळे या लॉकडाऊन काळात नेहमीच चर्चेत राहणा-या अभिनेता -दिग्दर्शक प्रसाद ओकने मात्र यावेळीसुध्दा नव्या फोटोतून  नेटक-यांना क्लिन बोल्ड केलं आहे. 

करोनामुळे आपण सर्वचजण घरी असलो तरी काही जीवनावश्यक वस्तूंसाठी आपल्याला बाजारात जावंच लागतं. तेव्हा पर्यायाने मास्क खबरदारी म्हणून घालणं बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक दिवस, महिने मास्क घातल्यानंतर आपली अवस्था कशी होईल याचं भन्नाट वास्तव नुकतंच प्रसादने त्याच्या पोस्टमधून मांडलं आहे. 

 

प्रसाद ओकने मास्कमुळे झालेली चेह-याची अवस्था पोस्ट केली आणि  चाहत्यांची पुन्हा एकदा हसून हसून पुरेवाट झाली. 

Recommended

Loading...
Share