By  
on  

सिद्धार्थने केला ‘अशी ही बनवा बनवी’ चा हा सीन रिक्रिएट

‘अशी ही बनवा बनवी’ सिनेमाने अख्ख्या पिढीला फॅन बनवलं आहे. या सिनेमाची मोहिनी आजही आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुधीर जोधी, सुप्रिया, निवेदीता जोशी असे उत्तमोत्तम कलाकार या सिनेमात भाव खाऊन जातात. ४ जूनला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने अशोक मामांना आगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

अशी ही बनवाबनवी सिनेमातील अशोक सराफ यांची धनंजय माने ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. या सिनेमातील धनंजय माने इथेच राहता का? हा मजेदार प्रसंग सिद्धार्थने आणि त्याच्या मित्रांनी हा सीन रिक्रिएट करत धमाल उडवली आहे. या सिनेमातील डायलॉग्वर अनेक मीम्स तयार झाले आहेत. आता सिद्धार्थचा सीन चाहत्यांना आवडेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive