By  
on  

या नायिकांनी घरातच राहण्याचा संदेश देत, घेतला हटके उखाणा

आज पर्यावरण दिवस आणि वटपौर्णिमेचा दिवस यांचा सुंदर योग जुळून आला आहे. खरं तर दरवर्षी झोकात साजरी होणारी वटपौर्णिमा यावेळी लॉकडाऊनमुळे घरीच साजरी करावी लागली. 

झी मराठीच्या लाडक्या नायिकांनीही हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये शुभ्रा, आसावरी आणि सुमी यांनी पतीच्या नावाचा हटके उखाणा घेत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या उखाण्यात एक खास बात आहे. या उखाण्याच्या माध्यमातून या

 

नायिकांनी घरीच सेफ राहून काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. आता प्रेक्षक त्यांच्या या लाडक्या नायिकांना मिस करत असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive