By  
on  

'इतिहास शिवरायांच्या वैभवशाली दुर्गसंपदेचा' , येणार 'बघतोस काय मुजरा कर'चा दुसरा भाग

'बघतोस काय मुजरा कर' या मराठी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड, किल्ले हे महाराष्ट्रीतल इतिहासाचं वैभव आहे. याकडे होणारं दुर्लक्ष अशा विषयावर हा सिनेमात होता. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे हे कलाकार यात मुख्य भूमिकेत होते.

 

आज शिवराज्याभिषेक दिनाचं निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून 'बघतोस काय मुजरा कर' सिनेमाचा दुसरा भाग येण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच याचा पहिला लोगो लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये हा सिनेमा येणार असल्याचं या पोस्टरमध्ये म्हटलय. रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयस जाधव आणि क्षिती जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. या दुसरा भागाचाही दिग्दर्शक असलेल्या हेेमंत ढोमे याने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची घोषणा केली आहे. 'बघतोस काय मुजरा कर २  मोहीम दुर्गबांधणी' असं या पोस्टरवर लिहीलं आहे. तर हेमंत ढोमेने या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, "राजं तुमचा मावळा शपथ घेतो.. आता तुमच्या दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिमानानं साऱ्या जगाला सांगणार.."

 

तेव्हा या दुसऱ्या भागात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. शिवाय पुन्हा दुसऱ्या भागासह शिवरायांच्या वैभवशाली दुर्गसंपदेचा इतिहास पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive