छोट्या पडद्यावरची ही अभिनेत्री कधीच दिसली नाही बोल्ड अंदाजात, तरीही जिंकते प्रेक्षकांची मनं

By  
on  

'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस अल्पावधित घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावरची आदर्श सून, मुलगी, एक उत्तम गृहिणी, प्रेयसी व बायको या सर्वच भूमिका तिने लिलया पार पाडल्या.

त्यानंतर 'अस्सं सासर सुरेख बाई',  'तु तिथे मी'  आणि आता 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतून मृणाल प्रेक्षकांची मनं जिंकतेय. 

 

आजकाल अनेक अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसण्याच्या मागे धावत असतात. त्यासाठी अनेक प्रकारचे नानाविविध फोटोशूट करुन घेण्याकडे त्यांचा कल असतो. पण मृणालने मात्र ही चाकोरी मोडीत काढली. 

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणेच मृणालने साधं-सिंपल राहून आपल्या सौंदर्यांने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं 

 

 

छोट्या पडदा गाजवणा-या नायिकांमध्ये मृणाल दुसानिस हे नाव अग्रस्थानी आहे. 

 

 तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या कार्यक्रमाद्वारे तिच्या नृत्यकलेचा नजराणाही प्रेक्षकांसाठी आणला

 

कधीही कुठल्याच कॉँट्र्व्हर्सीत न अडकलेल्या मृणालने टीपीकल अरेंज मॅरेज पद्धतीने लग्नगाठ बांधली आणि अमेरिकेत पतीसोबत संसार थाटला. काही वर्षानंतर मालिका तिला पुन्हा खुणावू लागल्या व ती एकटी भारतात परतली. तिचे पती नीरज मोरे  हे अमेरिकेत सॉफ्टेवेअर इंजिनिअर आहेत. 

 

खरोखरच अभिनेत्री असूनही मृणालने तिचा साधेपणा जपला आहे.

 

 

याच साधेपणातूनही प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतात तेसुध्दा मृणालने सिध्द करुन दाखवलं आहे. 

Recommended

Loading...
Share